Navratri 2023 : आपण सर्वजण वर्षभर नवरात्रीची वाट बघत असतो नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवीचा उपवास केल्याने देवी आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्या सर्व मनोकामना पुऱ्या होतात. आपण नवरात्रीमध्ये देवीची स्थापना घरात तसेच सार्वजनिक मंडळात सुद्धा करत असतो. नवरात्रीमध्ये रोज वेगवेगळ्या रंगाच्या साड्या किंवा कपडे घालावे अशी रीत आहे पण तुम्हाला माहिती आहे का आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या नवरात्री आधी तुम्ही घरी आणल्यामुळे किंवा खरेदी केल्यामुळे तुमचे नशीब बदलू शकते व देवीचा आशीर्वाद मिळू शकतो. चला बघूया..
रविवार, 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला (Navratri 2023) सुरुवात होणार असून सध्या राज्यभरात तिच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. नवरात्रीमध्ये दुर्गादेवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा करून तिला प्रसन्न करून तिचा आशीर्वाद मिळवता येतो. पण अशा काही खास गोष्टी आहेत ज्या घरात आणून किंवा खरेदी करून मातेचा खास आशीर्वाद मिळवता येतो. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत, ज्या नवरात्रीमध्ये घरात ठेवल्या तर नेहमी सुख-समृद्धी येऊन भरभराट होते.
कलश
गणेशोत्सव असो नवरात्री किंवा इतर कोणताही घरगुती धार्मिक कार्यक्रम त्यावेळी पूजेच्या वेळेस कलशाचे खूप महत्त्व आहे. कलश त्याची स्थापना करणे किंवा त्याला टीका (पूजा ) करणे हे होतच असते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना तर केली जाते पण नवरात्रीच्या आधी जर तुम्ही सोने, चांदी, पितळ किंवा इतर कोणत्याही धातूचा प्रकारचा कलश खरेदी केला तर तो तुम्हास खूप शुभ ठरेल असे मानले जाते.
लाल चंदनाची माला
माता दुर्गाला लाल चंदनाची माळ खूप आवडते. नवरात्रीमध्ये लाल चंदनाच्या माळा घालून भक्त माँ दुर्गेच्या मंत्रांचा जप करतात. या वेळी नवरात्रीमध्ये लाल चंदनाच्या माळा घरी नक्की आणा. लाल चंदनाच्या जपमाळेने जप केल्याने दुर्गा देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो.
दुर्गा मातेची मूर्ती
नवरात्रीमध्ये दुर्गादेवीच्या पूजनासाठी बरेच लोक देवीच्या फोटोंचा वापर करतात व काही ठिकाणी मूर्तींचा वापर केला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसाची देवीची नऊ रूपे मानली जातात. त्यामुळे जर तुम्ही नवरात्री आधी दुर्गा देवीची एखादी मूर्ती किंवा आज-काल सहज दुकानांमध्ये उपलब्ध असलेली दुर्गादेवीची पादुके घरी आणलीत तर हे तुमच्यासाठी खास शुभ ठरू शकते.
साडी चोळी
नवरात्रीमध्ये सहसा आपण बघतो की बायका नऊ दिवसासाठी नऊ वेगवेगळ्या साड्या घालायचा प्रयत्न करत असतात. पण ज्या ठिकाणी मूर्तींची स्थापना केली जाते त्या ठिकाणी जर देवीच्या मूर्तीला नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या रंगाच्या साड्या नेसवल्या तर अति शुभ ठरू शकते. किंवा नवरात्रीमध्ये दुर्गा देवीला लाल, गुलाबी किंवा पिवळ्या रंगाची साडी चोळी अर्पण केल्यामुळे माता दुर्गा प्रसन्न होऊन आशीर्वाद देईल. दुर्गे माता च्या आशीर्वादाने तुमचा भरभराट व तुमची प्रगती होऊ शकते.
हे देखील वाचा 👉 देवी लक्ष्मी घरी येण्यापूर्वी देते हे संकेत, यातील ‘1’ जरी संकेत मिळाला तर माणसाच नशीबच बदलत.
