Navratri 2023 : आज घटस्थापना असून आजपासून नवरात्रीला सुरुवात होत आहे. या नऊ दिवसात माता दुर्गेची पूजा, आराधना करण्यात येणार आहे. नवरात्रीच्या या नऊ दिवसांचे विशेष महत्त्व आहे. ग्रहांच्या दिशा व स्थान बदलण्यामुळे शुभ अशुभ योग निर्माण होतच असतात.
Navratri 2023 Shubh Sanyog And Horoscope : ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल 30 वर्षांनंतर नवरात्रीला ग्रह आणि तारे यांचा दुर्मिळ योगायोग जुळून आला असून कन्या राशीत सूर्य आणि बुध यांच्या युतीतून बुधादित्य योग (Budhaditya Rajyoga)आहे. त्याशिवाय शश राजयोगही (Shasha Rajyoga) तयार होतो आहे.
30 वर्षांनंतर, शनी स्वतःच्या राशीत कुंभ राशीत राहील आणि बुध देखील स्वतःच्या राशीत राहून भद्रा योग( Bhadra Yoga)होणार आहे. चंद्र गोचरमुळे मंगळ आणि केतु ग्रह तूळ राशीत आहे. या दोन ग्रहांमुळे आज अंगारक योग, ग्रहण योग आणि मंगळ आणि चंद्राची युतीतून लक्ष्मी योग आहे. या योगामुळे देवी माता काही राशींवर धनवर्षाव करणार आहे. चला तर मग बघूया कोणत्या नशीबवान राशी आहेत त्या?
मेष
या राशीच्या लोकांसाठी बुधादित्य योग खूप शुभ असणार आहे. या राशीच्या लोकांना माता दुर्गेच्या कृपेने घर आणि वाहनाचे सुख लाभणार आहे. या राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो.तुमच्या कार्यक्षेत्रात मोठं यश प्राप्त होणार आहे. चांगली नोकरीची ऑफर तुम्हाला येणार आहे. परदेशात जाण्याची संधी सुद्धा मिळू शकते. व्यवसायात तुम्हाला आर्थिक लाभासह प्रगतीची संधी मिळणार आहे. प्रवास करताना काळजीपूर्वक करावा. कौटुंबिक नात्यात गोडवा निर्माण होणार आहे.
कन्या (Virgo Zodiac)
कर्क राशीच्या लोकांसाठी या महिन्यात बुधादित्य राजयोग खूप फायदेशीर ठरणार आहे. माता दुर्गा तुमच्यावर कृपाने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. समाजात तुमचा मान-सन्मान वाढणार आहे. मित्रांच्या मदतीने तुमची अनेक प्रलंबित कामं सहज मार्गी लागणार आहेत. चांगली नोकरीची ऑफर तुम्हाला येणार आहे. तुम्हाला सोने किंवा चांदी खरेदीचा योग निर्माण होणार आहे.
तूळ (Libra Zodiac)
या महिन्यात बुधादित्य राजयोग तयार झाल्यामुळे तूळ राशीचे लोक अचानक श्रीमंत होणार आहेत. तुम्हाला यश मिळण्याची अनेक संधी लाभणार आहे. नवरात्रीमध्ये माँ दुर्गेसाठी उपवास केल्याने तुम्हाला अपेक्षित फळ लाभणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीशी फायदा होणार आहे. सोने खरेदी करण्याची संधी तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. तुमचे व कुटुंबीयांची तब्येत एकदम ठणठणीत जाणार आहे.
मकर (Capricorn Zodiac)
या महिन्यात बुधादित्य योगाची निर्मिती मकर राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. नवरात्रीच्या काळात तुम्हाला काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. तुमच्या करिअरमध्ये प्रगती होणार असून नफा दुपटीने वाढणार होणार आहे. तुमच्या घरात भौतिक सुखाच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. तुम्हाला वाहनसुख मिळू शकते. नोकरदारांना पदोन्नती आणि पगारात वाढ होण्याचे योग निर्माण झाले आहेत.
हे देखील वाचा

👉 नवरात्री २०२३: नवरात्रीच्या नऊ दिवसांचे ९ रंग आणी त्यांचे महत्व; जाणून घ्या.
👉 नवरात्री 2023 मंत्र : नवरात्रीचे ९ दिवस करा ‘या’ विशेष मंत्रांचा जप, देवी होईल प्रसन्न करेल धनवर्षा.