मकर राशीत शुक्र संक्रमण (Shukra Gochar In Makar) : खगोलशास्त्राप्रमाणे सूर्य चंद्र ग्रह तारे हे आपली दिशा व स्थान बदलत असतातच, त्यामुळे अनेक शुभ अशुभ योग निर्माण होतात. ज्योतिषशास्त्राच्या मते ग्रहांची जागा बदलल्यामुळे त्याचे परिणाम मनुष्य जीवनावर सुद्धा होतात. शुक्र ग्रह 2024 मकर राशीत प्रवेश करणार आहे. याचा मकर राशि लोकांना तर फरक पडणारच आहे शिवाय आणखी काही राशींवर मुख्य परिणाम पडणार आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्याही त्या राशी.
मकर राशीत शुक्र संक्रमण :(Shukra Gochar In Makar)
2024 मध्ये अनेक लहान-मोठे ग्रह आपली राशी बदलणार आहेत पण त्यातील मकर राशीतील शुक्राचे संक्रमण हे पाहण्याजोगे राहणार आहे. (शुक्र गोचर) शुक्र ग्रहाला धनाचा देवता म्हणून सुद्धा ओळखले जाते. नवीन वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात, शुक्र ग्रह आपला मित्र शनिची सर्वात आवडती राशी मकर राशीत बदलेल, ज्याचा प्रभाव सर्व राशींच्या जीवनावर दिसून येईल. यामुळे मकर राशीला आर्थिक धन लाभ होऊन आणखीही काही फायदे होणार आहेत. तसेच मकर राशी बरोबर आणखीही दोन राशींना याचा फायदा होणार आहे, चला जाणून घेऊया.
मकर राशी
शुक्राचे संक्रमण मकर राशीसाठी नवीन वर्षात फायदेशीर ठरणार आहे, कारण शुक्र ग्रह तुमच्या राशीमध्येच भ्रमण करणार आहे, ज्यामुळे तुम्हाला नवीन लोक भेटू शकतात. जर तुम्ही कोणाशी मैत्री करत असाल तर त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊ शकते. नवीन वर्षात तुमच्या जोडीदारासोबतचे नाते आणखी गोड होणार आहे. करिअरमध्ये अथवा नोकरीमध्ये ही यश मिळेल. नवीन वर्षात तुम्हाला तुमचा इच्छित जोडीदार मिळेल आणि नवीन वर्ष अविवाहित लोकांसाठी त्यांच्या विवाह योग व खूप आनंद घेऊन येनार आहे. जर तुम्ही नवीन वर्षात नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्यातही मोठे यश मिळू शकते. ज्योतिष शास्त्रानुसार तुमच्या राशीच्या पाचव्या आणि दहाव्या घराचा स्वामी शुक्र आहे.
वृषभ राशी
नवीन वर्षात वृषभ राशीच्या लोकांसाठी शुक्राचे संक्रमण अनुकूल ठरणार आहे. कारण, शुक्र ग्रह हा तुमच्या राशीचा स्वामी आहे. यासोबतच शुक्र ग्रह तुमच्या कुंडलीच्या नवव्या घरात जाईल, ज्यामुळे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. यासोबतच नवीन वर्षात ऑफिसच्या कामानिमित्त देश-विदेशात फिरता येईल. एवढेच नाही तर परदेशात जाऊन नोकरी करण्याचा विचार करत असाल तर त्यात यशही मिळू शकते. जर तुम्ही नोकरी केली तर तुम्हाला नोकरीशी संबंधित काही उत्तम संधी मिळू शकतात. ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी परीक्षा दिली आहे त्यांना नवीन वर्षात त्या परीक्षेत नक्कीच यश मिळेल. जर तुमचे जुने पैसे कुठे अडकले असतील तर ते तुम्हाला नक्की परत मिळतील.
कन्या राशी
नवीन वर्षातील शुक्राचे संक्रमण कन्या राशीच्या लोकांसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे. कारण, हे संक्रमण तुमच्या राशीच्या पाचव्या घरात होणार आहे. म्हणून, नवीन वर्षात तुम्हाला मुलांबद्दल चांगली बातमी मिळू शकेल. जर तुम्ही नोकरी शोध असाल तर तुम्हाला नोकरीही मिळू शकते आणि नोकरीबरोबर छोकरी मिळू शकते म्हणजेच नोकरीसोबतच तुमचे लग्न होण्याचीही शक्यता आहे आणि जर कन्या राशीच्या लोकांचे आधीपासूनच प्रेमसंबंध चालू असतील तर त्याचे रुपांतर लग्नात होऊ शकते. याद्वारे तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. तुम्हाला कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळेल, त्यानंतर काही महत्त्वाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर येऊ शकते, व त्या तुम्ही आत्मविश्वासाने यशस्वीरित्या पूर्ण कराल.
👉 अडीच वर्ष शनी राहणार या राशीत, शुभ की अशुभ पहा काय होईल परिणाम.