Four Rajyog in Diwali 2023: नवरात्रीचे तीन दिवस झाले असून आता दसरा उंबरठ्यावर आला आहे व त्यानंतर आहे मोठा सण दिवाळी. दिवाळी हा आनंदाचा, उत्साहाचा आणि भरभराटीचा सण आहे. पंचांगानुसार, यंदा १२ नोव्हेंबरला दिवाळीचा सण देशभरात साजरा होणार आहे. या दिवशी लक्ष्मीच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, यंदाच्या दिवाळीला चार राजयोग तयार होणार आहेत. सूर्य,ग्रह, चंद्र तारे हे स्वतःची जागा व दिशा बदलत असल्यामुळे शुभ अशुभ योग निर्माण होत असतात. शनिदेव शश राजयोग निर्माण करणार आहेत तर मंगळ आणि सूर्यदेवाच्या युतीनेही राजयोग तयार होणार आहे. शनिदेव स्वराशीत प्रवेश करुन शश राजयोग (Sash Rajyog )घडवणार आहेत. तर आयुष्यमान योग ही याच काळात तयार होणार आहे. अशाप्रकारे चार राजयोग बनल्याने काही राशींना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूयात कोणत्या आहेत या राशी…
👉 Diwali 2023: दिवाळीला लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होण्यासाठी घरात अश्या लावा पणत्या.
👉 Diwali Puja Tips: दिवाळी पूजेसाठी लक्ष्मी-गणेशाची मूर्ती खरेदी करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा.
‘या’ 3 राशींचे लोकांचे नशीब पटणार
मेष राशी
मेष राशींच्या लोकांना या काळात चांगल्या बातम्या ऐकायला मिळू शकतात. मेष राशीच्या लोकांचा बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायाशी संबंधित व्यक्तींना अनुकूल परिणाम मिळू शकतात. तुमच्या करिअरमध्ये मोठी प्रगती होऊ शकते. विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण आनंदाने भरलेले राहू शकते. नवरा बायको मध्ये परस्पर संबंध अतिशय चांगले राहतील. फक्त तब्येतीची काळजी घ्या.
मकर राशी
मिथुन राशीच्या लोकांना यंदाच्या दिवाळीत मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. हे चार राजयोग तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतात. या काळात तुम्हाला नोकरीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसायात गुंतलेल्यांना चांगला नफा मिळू शकतो. या काळात या राशीतील लोकांच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा दिसून येऊ शकते. जर तुम्ही परदेशात जाण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमचा प्रयत्न यावेळी नक्की यशस्वी होऊ शकतो.
मिथुन राशी
यंदाच्या दिवाळीत चार राजयोग बनल्याने मिथुन राशींच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी हे राजयोग तुमच्यासाठी शुभ ठरु शकतात. या काळात प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळू शकते. नोकरदार वर्गासाठीही हा काळ धनलाभाचा ठरु शकतो. बोनस, पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच व्यावसायिक धारकांना मोठ्या ऑर्डर मिळू शकतात व त्यातून ते मोठा नफा कमवू शकतात. आरोग्याकडे लक्ष द्या.
हे देखील वाचा 👉
👉 Narak Chaturdashi 2023: नरक चतुर्दशी ला यमराजाची पूजा का केली जाते, जाणून घ्या यमपूजेची अचूक पद्धत.
👉 आजच्या व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लीक करा.
(Marathimadhun.com अंधश्रद्धेला दुजोरा देत नसून वरील माहिती उपलब्ध स्रोतातून देण्यात आलेली आहे. माहितीच्या तात्थ्यांबद्दल आम्ही कोणताही दावा करत नाही.)