Chanakya Niti: जर तुम्हाला एक कुशल नायक बनायचे असेल तर आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या “या” 3 गोष्टी कायम लक्षात ठेवा. (आचार्य चाणक्य नेतृत्वगुण)
Chanakya Niti: आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टींमध्ये जीवनात यश मिळवण्याचे रहस्य दडलेले आहे. सध्या फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेर परदेशातही चाणक्य नीती चा अभ्यास केला जात आहे.
आचार्य चाणक्य यांनी कुशल नायक बनण्यासाठी आपण आपल्या अंगी कोणते गुण असायला हवेत ते सांगितले आहे, चला तर मग जाणून घेऊया आचार्य चाणक्य काय सांगतात.
Chanakya Niti: कुशल नायक बनण्यासाठी अंगी कोणते गुण असावेत | Chanakya Leadership Qualities
तुमच्या योजना इतरांना सांगू नका
आचार्य चाणक्यांच्या मते, एक चांगला नायक त्याच्या योजना कधीच कुणासोबत शेयर करत नसतो, जर तुम्हाला एक कुशल नायक बनायचे असेल व तुम्ही आपल्या योजना इतरांना सांगत असाल तर ते आजच बंद करा. आचार्य चाणक्य म्हणतात की आपल्या योजना इतरांना सांगण्यापेक्षा त्या योजनेवर शांतपणे काम सुरु करावे. जेव्हा ती योजना पूर्ण होईल तेव्हा इतरांना आपोआपच कळेल, व तेव्हा ते तुमची प्रशंसाच करतील. आधीच इतरांना तुमची योजना सांगितलीत तर ते तुमच्या योजनेतील त्रुटीच तुम्हाला दाखवतील आणी तुमचे मनोबल खचवतील. म्हणून आपल्या योजन, आपले लक्ष प्राप्त होई पर्यंत कुणालाच ते सांगू नका. ते प्राप्त करण्यासाठी सतत मेहनत करत राहा.
संघातील प्रत्येक सदस्यांचे म्हणणे विचारात घ्या
आचार्य चाणक्य सांगतात की, कोणत्याही योजनेवर काम करत असताना आपला संघ (team) अशी निवडा की त्यातील प्रत्येक सदस्य विश्वासास पात्र असेल. असा संघ बनवून काम सुरु करा आणी आपल्या टीम मधील प्रत्येक सदस्यांचे म्हणणे विचारात घ्या, आपले विचार त्याच्यावर जबरदस्तीने थोपवू नका, आपली योजना यशस्वी होण्यासाठी आपल्या संघातील प्रत्येक सदस्यांचे त्याबद्दल काय विचार आहेत हे देखील बघा. असे केल्याने तुम्हाला तुमची योजना लवकरात लवकर पूर्ण करता येईल, तुम्हाला काही नवीन चांगल्या आयडिया सुचतील. त्यामुळे टीम वर्क वर फोकस करा.
संयम ठेवा
चाणक्यच्या मते, नियोजनबद्ध पद्धतीने काम पूर्ण करण्यासाठी संयम बाळगणे आवश्यक आहे. घाईत केलेल्या कोणत्याही कामात निष्काळजीपणाचा धोका नेहमीच असतो, आणी त्यामुळे ते काम उच्च दर्जाचे होऊ शकत नाही, त्यामुळे आपले काम सावकाश विचारपूर्वक करा, आणी ते काम पूर्ण करत असताना संयम ठेवा. काम कधी पूर्ण होईल हा विचार करण्यात आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा तोच वेळ आपले काम करण्यात घालवा. असे केल्याने तुमच्या मनात नकारात्मकता निर्माण होणार नाही.
हे सुद्धा वाचा 👉
👉 जर कुटुंबप्रमुखामध्ये हे 5 गुण असतील तर कुटुंबात नेहमीच आनंदी वातावरण राहील.