Navaratri 2023 Colors Marathi: गणेशोत्सव, दिवाळी याप्रमाणेच नवरात्री याही सणाला एक विशेष महत्व आहे. यंदा शारदीय नवरात्री १५ ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. आपण सर्वजण यावेळी नवरात्रीला उपवास धरतो, देवीची प्रतिष्ठापना करून तिची पूजा करतो. पण तुम्हाला माहित आहे का या नवरात्रीच्या नऊ दिवसांना खूप महत्त्व आहे या नऊ दिवसांना नऊ वेगवेगळ्या रंगांचा विशेष मान प्राप्त आहे. चला तर मग बघूया दिवसानुसार रंगांचे महत्त्व.
धार्मिक ग्रथांनुसार, नवरात्रात केलेल्या देवी पूजनामुळे शक्ती, ज्ञान, आनंद, सुख, समृद्धी, समाधान, कीर्ती, मान, सन्मान, धन-वैभव प्राप्त होते तसेच भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख, शांतता नांदते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
नवरात्रीच्या नऊ दिवसात रोज कोणत्या रंगाचे महत्त्व आहे व कोणत्या रंगाचे कपडे घातल्यामुळे देवी प्रसन्न होईल हे जाणून घेऊया.
Navratri 2023 Colours Marathi | नवरात्री 2023 कलर्स मराठी
रविवार, १५ ऑक्टोबर- नारंगी रंग
या दिवशी नारंगी रंगाचे कपडे परिधान करून जर देवी नवदुर्गाची पूजा केली तर ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळेल, शिवाय हा रंग सकारात्मक उर्जेने भरलेला असतो आणि व्यक्तीचे मन उत्साही ठेवतो. यामुळे घटस्थापनेदिवशी या रंगाला खूप महत्त्व आहे.
सोमवार, १६ ऑक्टोबर – पांढरा रंग
पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणा दर्शवतो. तसेच पांढऱ्या रंगाला शांतीचे प्रतीक मानले जाते. जर सोमवारी पांढरा रंगाचे कपडे परिधान करून देवीची पूजा केल्यास तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयास शांतता व सुरक्षितता तुम्हाला लाभू शकते.
मंगळवार,१७ ऑक्टोबर – लाल रंग
लाल रंग हा उत्साहाचे आणि प्रेमाचे प्रतीक मानला जातो. जर मंगळवारी लाल वस्त्र घालून तुम्ही देवीच्या चरणी एखाद्या लाल गुलाबाचे फुल किंवा देवीला लाल रंगाची ओढणी अर्पण केलीत तर तुमच्यावर व कुटुंबीयांवर सुख समृद्धी नांदू शकते.
बुधवार, १८ ऑक्टोबर – गडद निळा रंग
निळा रंग हा वास्तविकता आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो बुधवारी नवरात्रोत्सवादरम्यान जर तुम्ही गडद निळा रंगाचे कपडे घालून देवीची पूजा केल्यास तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात.
गुरुवार, १९ ऑक्टोबर – पिवळा रंग
पिवळा रंग हा आशावादी आणि आनंदाची प्रतीक मानला जातो. पिवळा रंग तुमच्या सकारात्मकता भरून जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत करतो. नवरात्रोत्सवात गुरुवारी जर तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करून देवीची पूजा केलीत तर तुम्ही खूप आशावादी आणी सकारात्मक व्हाल.
शुक्रवार, २० ऑक्टोबर – हिरवा रंग
हिरवा रंग हा निसर्गाचे प्रतीक आहे तसेच वाढ, प्रजनन, शांतता आणि स्थिरतेची भावना निर्माण करतो. शुक्रवारी हिरवा रंग परिधान करून जर देवीकडे प्रार्थना केली तर तुमच्या आयुष्याला शांती लाभेल तसेच हिरवा रंग जीवनातील नवीन सुरुवात देखील दर्शवतो.
शनिवार, २१ ऑक्टोबर – राखाडी रंग
राखाडी रंग सरळता आणि शांतता दर्शवितो. जर शनिवारी तुम्ही राखाडी रंगाची वस्त्र परिधान करून देवीची पूजा केली तर तुम्हाला स्थिरता आणि सरळता भेटेल, हा रंग अशा भक्तांसाठी योग्य आहे ज्यांना फिकट रंग आवडतो.
रविवार, २२ ऑक्टोबर – जांभळा रंग
जांभळा रंग भव्यता आणि राजेशाही चा प्रतीक मानला जातो. नवदुर्गेच्या पूजेमध्ये जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुख-समृद्धी मिळते. त्यामुळे रविवारी देवी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी जांभळ्या रंगाचे कपडे घातल्यास देवी प्रसन्न होण्याचा मार्ग सुलभ होईल.
सोमवार, २३ ऑक्टोबर – मोरपंखी रंग
मोरपंखी रंग हा निळ्या आणि हिरव्या या दोन रंगांचे मिश्रण असून तो या एकीचे व मिळून मिसळून राहण्याचे गुण प्रकट करतो. तसेच त्याचबरोबर मोरपंखी रंग विशिष्टता आणि व्यक्तिमत्व दर्शवतो. समृद्धी आणि नवीनतेचा लाभ मिळवण्यासाठी सोमवारी मोरपंखी रंगांचे वस्त्र धारण करून देवीची पूजा करा.
हे देखील वाचा 👉 Navratri 2023 : येत्या नवरात्रीच्या आधी घरी घेऊन या यातील ‘1’ वस्तू; आपल्यावर होईल लक्ष्मीची कृपा.
सध्या ट्रेंडिंग 👉