Raksha Bandhan 2023: या रक्षाबंधन ला भावाला राखी बांधताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा
रक्षाबंधन 2023: रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीतील अतूट प्रेमाचे प्रतीक आहे. या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला प्रत्येक कठीण प्रसंगी तिचे रक्षण करण्याचे वचन देतो आणि बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. भावा-बहिणींचे नाते जपणारा रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो.
भावाला राखी बांधताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा
बहिण भावाला रिकाम्या हाताने राखी बांधते हे चुकीचे आहे. राखी बांधताना भावाचा हात भरलेला असावा अशी परंपरा आहे. त्यामुळे बहिणी भावाच्या हातात नारळ ठेवतात, भाऊ नारळ हातात धरतात आणि बहीण राखी बांधते. भावाच्या हातात लक्ष्मी सदैव राहावी, अशी इच्छा हातात नारळ धरण्याच्या मागे असते. नारळ हातात ठेवल्याने महालक्ष्मीचा आशीर्वाद लाभतो.
हातात नारळ नसेल तर भाऊ हातात काही पैसे ठेवून राखी बांधू शकतो. पण याशिवाय वेगळे काहीही हातात ठेवू नये.
राखी बांधताना 3 गाठी बांधा. या बांधणीत पहिली गाठ भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी, दुसरी गाठ सुख-समृद्धीसाठी आणि तिसरी गाठ ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे ध्यान करून भावा बहिणीचे नाते दृढ करण्याच्या इच्छेने बांधली जाते.
रक्षा बंधन च्या दिवशी काळे कपडे घालू नयेत कारण ते नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात.
राखी बांधताना भावाचे तोंड पूर्वेकडे आणि बहिणीचे तोंड पश्चिमेकडे असावे.
👉 सध्या ट्रेंडिंग