वास्तुशास्त्र : निसर्गाच्या नियमानुसार तसेच शास्त्रांचा व ग्रह चंद्र ताऱ्यांचा अभ्यास करून प्रत्येक गोष्टीची जागा वेळ व अवतार ठरवलं जात त्यास वास्तुशास्त्र मानण्यास हरकत नाही. वास्तुशास्त्रानुसार जर एखादी व्यक्ती नियमितपणे काही काम करत असेल तर त्याचा चांगला फायदा होतो. देवी लक्ष्मी त्याच्यावर कृपा करून त्या व्यक्तीची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस सुधारते. व तो मनुष्य सहकुटुंब सुखी व संपन्न होतो.
झोपेसाठी वास्तु टिप्स : हिंदू धर्मात देवतांना माता पिताचे स्थान प्राप्त आहे. माता लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हणून ओळखले जाते तर माता लक्ष्मी प्रसन्न झाली तर ती भरपूर संपत्तीचा वर्षाव करते व भरभराटी होते. त्यामुळे लोक लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतात. तसेच धनवान होण्यासाठी व्यक्तीने असे काम करावे जे देवी लक्ष्मीला आवडते. वास्तुशास्त्रात सांगितले आहे की कोणते काम केल्याने लक्ष्मीची कृपा होते. चला तर मग बघूया कोणती आहेत ती कामे?
हे काम झोपण्यापूर्वी करा
असे म्हटले जाते की संध्याकाळ च्या वेळेस माता लक्ष्मी प्रवासास निघते याच वेळी जर तुमच्या घरातील वातावरण किंवा काही गोष्टी माता लक्ष्मीच्या पसंतीस आल्या तर ती तुमच्या घरात प्रवेश करते व तिथेच नांदून राहते अशाप्रकारे धनलाभ होऊन तुमची भरभराटी होऊ शकते. त्यासाठी माता लक्ष्मीची पूजा ही रात्रीच केली जाते. त्यामुळे रोज झोपण्यापूर्वी माता लक्ष्मीची पूजा करावी.
आज कालच्या गडबडीच्या जीवनामध्ये आपण सहसा दमून जातो त्यामुळे कधी तरी किचनमध्ये जेवण झाल्यावर खरकटी भांडी तशीच सकाळी धुण्यासाठी ठेवतो. पण खरकटी भांडी किचनमध्ये तशीच रात्रभर कधीच ठेवू नये कारण की अन्न असे पडलेले हा माता अन्नपूर्णेचा अपमान आहे व माता अन्नपूर्णा हा माता लक्ष्मीचा अवतार आहे.
दिवसभर वर्धळ झाल्यामुळे आपले घर संध्याकाळपर्यंत परत घाण झालेले असते केर, कचरा व घाण पसरलेली दिसते. पण संध्याकाळच्या आधी आपले घर पुन्हा एकदा साफ करून स्वच्छ नीटनेटके ठेवावे कारण माता लक्ष्मीला घाण कचरा अजिबात आवडत नाही तिला साफसफाई खूप पसंद आहे.
वास्तुशास्त्रात उत्तर दिशा ही अत्यंत शुभ आणि देवी-देवतांची दिशा मानली जात असून भगवान कुबेर यांची ही आवडती दिशा आहे. त्यामुळे उत्तर दिशा नेहमी नीटनेटकी व स्वच्छ ठेवावी. यामुळे घरात नेहमी संपत्ती स्थिरावते त्यामुळे रात्री उत्तर दिशेला घाण ठेवू नये अथवा करू नये.
आपण देवीची पूजा सकाळ संध्याकाळ दोन वेळेस करतो त्यावेळेस देवीच्या फोटोंवर किंवा मृत्यूंवर फुलांचे माळ किंवा हार घालतो. पण सकाळी घातलेली फुले संध्याकाळपर्यंत कोमजतात. मग फुले असो किंवा काही दुर्वा आघाडा अशाप्रकार चे निर्माल्य हे देवीला तसेच ठेवू नये किंवा देवीच्या समोर ठेवू नये तेथून ते दुसरीकडे ठेवावे. तसेच देवीच्या समोर कलशा मधील पाणी हे सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस शिळे फेकून ताजे भरून ठेवावे. जर शिळे पाणी आणी निर्माल्य तसेच देवी समोर ठेवले तर देवीचा कोप होतो व ती नाराज होऊ शकते.
